। पनवेल । वार्ताहर ।
15 वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना कळंबोली पोलिसांनी घेतल्याने या खूनाची उकल झाली आहे.कळंबोली पोलीस ठाणे,हद्दीत दि 23 ऑगस्ट रोजी सकाळी साताच्या सुमारास पुजा भवानी डेअरी फार्म समोरील रोडचे कडेला एक 15 वर्षीय युवक जखमी अवस्थेत निपचित पडलेला आढळून आलेला होता त्यास उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय ,पनवेल येथे दाखल केले असता,त्यास तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्याप्रमाणे सदर प्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हयाचे घटनास्थळी विपिन कुमार सिंह, पोलीस आयुक्त त्यांच्या पथकाने तपास चालु केला.
मयत यास गांजा,दारू,भांग गोळी इ.व्यसनाची सवय होती.त्यासाठी तो कळंबोली परीसरात रात्री अपरात्री फिरून त्याचे मित्रांसह लहान मोठया चोर्या करून त्यातून मिळणारे पैशातून नशा करीत असल्याची माहीती समोर आली. मयत नितेश दुबेदी त्या ठिकाणी दारू पिण्यास का आला असे बोलून हाताने मारहाण केली होती.नितेश दुबेदी यास डोश्या बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण करून ते निघून गेले. यात त्याचा मृत्यु झाला होता.
गुन्ह्यामध्ये कोणताही धागादोरा नसताना मयत याची पार्श्वभूमी व इतर सर्वकश बाबींचा बारकाईने व कौशल्याने तपास करून मयतासोबत दारू पिणारे व नंतर गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न करून कळंबोली पोलीस ठाणेकडील अधिकारी अमलदार यांनी सदरचा गंभीर असा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तपासकामी कळंबोली पोलीस ठाणेचे संजय पाटील, नितीन कुंभार, मनेश बच्छाव व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सर्व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन अहोरात्र मेहनत घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे .







