तीन बालकामगारांची सुटका

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेलमधील दोन वेगवगेळ्या शॉपवर छापा मारुन तीन बालकामगारांची सुटका केली आहे. तसेच या बालकामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन त्यांना राबवून घेणार्‍या दोन्ही शॉप मालकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पनवेलमधील एमटीएनएल रोडवरील अ‍ॅसपायर प्राईड या इमारतीतअसलेल्या बिकानेर स्विट्स कॉर्नरमध्ये जाऊन पहाणी केली असता सदर शॉपमध्ये 17 वर्षीय मुलगा ग्राहकांना चहा, नाष्टा देण्याचे काम करताना आढळून असून, शॉपचा मालक रामलाल चौधरी याला ताब्यात घेतले. त्यानंतर पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजार समिती भागात असलेल्या राजेश्‍वरी कोल्ड्रींक्समध्ये जाऊन पाहणी केली असता, शॉपमध्ये दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुले पाण्याचे बॉक्स तसेच कोल्ड्रींक्सचे बॉक्स उचलण्याचे काम करताना आढळून आली. या दोन्ही मुलांची सुटका करुन शॉप मालक गिरीशभाई पटेल याला ताब्यात घेतले.

Exit mobile version