| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे ही म्हण सार्थ करणारी घटना अलिबाग श्रीबाग येथील गॅस शवदाहीनी येथे घडली आहे. या शवदाहिनीतील तीन सिलेंडर गॅसच्या टाक्या चोरण्याचा प्रकार झाला आहे.
श्रीबाग येथे गॅस शवदाहीनी आहे. त्यासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या टाक्या तेथे ठेवलेल्या असतात. अज्ञात चोरटयाने या तीन टाक्याच चोरून नेल्या आहेत. तिथे मुकादम म्हणून काम करणाऱ्या माने यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस हवालदार एस.एस. मगर करीत आहेत.







