तिघा डिझेल चोरांना ठोकल्या बेड्या

पोलिसांकडून स्कॉर्पिओही जप्त


| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील कोलाड वरसगाव हद्दीत शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपनजीक रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रकच्या टाकीमधून डिझेल चोरी करताना तीन आरोपी गस्तीवरील पोलिसांना मिळून आले आहेत. या चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरसगाव येथील पेट्रोल पंपानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीमधून काही इसम डिझेल चोरी करत असताना व चोरी केलेले डिझेल हे कॅनमध्ये भरून स्कॉर्पिओ गाडीतून घेऊन जाण्याच्या बेतात असताना कोलाड पोलीस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील अंमलदार पोहवा पाटील, चालक पोना महाडिक त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांना पाहून त्यापैकी दोघे बाजूच्या झाडीमध्ये पळाले, तर एक इसम स्कॉर्पिओ गाडीसह पळून जात असताना त्याला ताब्यात घेतले. तसेच अन्य पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले.

दरम्यान, स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये प्रत्येकी 35 लीटर क्षमतेचे एकुण 08 प्लास्टीकचे कॅन त्यामध्ये एकूण 280 लीटर डिझेल मिळून आले. आरोपी हे सदरचे ट्रक चालकांना दमदाटी करून मारून टाकण्याची धमकी देऊन डिझेल चोरी करून घेऊन जाताना मिळून आलेले आहेत.

राजेश भगवान पवार, रा. कोपरखैरणे नवी मुंबई, इशाक अश्फाक खान, रा. रोडपाली, नवी मुंबई, साजीद इस्लाम शेख, रा. वाशी, नवी मुंबई अशी आहेत. त्यांच्याविरोधात याअगोदरदेखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात 4,21,040/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबतचा अधिक तपास सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चेतन कुथे हे करीत आहेत.

Exit mobile version