। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील शिरढोण परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ट्रेलरमधून सुमारे 650 लिटर डिझेलची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडखळ ते वाडा प्रवास करत असताना झोप आल्याने ट्रेलर चालक दिलीप कुमार यांनी आपला ताब्यातील ट्रेलर रस्त्याच्या कडेला गाडी लावून गाडीमध्ये आराम करत असताना अज्ञात चोरट्याने त्या ट्रेलरमधील 450 लिटर तसेच बाजूला उभ्या असलेल्या आणखी एका ट्रेलरमधून 200 लिटर डिझेल चोरून नेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल परिसरात असलेल्या अनेक ढाबे व हॉटेल परिसरात उभ्या करून ठेवलेल्या वाहनांमधून डिझेल व पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांसह ढाबे चालक करत आहे.







