शिवांश फासेला तीन सुवर्ण पदके

| पनवेल | वार्ताहर |

29वी युरो एशिया इंटरनेशनल डब्ल्यू. एफ. एस. के. ओ. ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा प्रियदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुलुंड येथे घेण्यात आली होती. वयोगट 10 ते 12 मध्ये पनवेल येथील रहिवाशी शिवांश संकेत फासे याने तीन सुवर्ण पदके प्राप्त केली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सतर्फे शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत कराटे, कता आणि कुमीते अशी एकूण तीन सुवर्ण पदके प्राप्त केली. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version