उरण रेल्वे स्थानकाजवळ अपघात; तिघे जण गंभीर जखमी

। उरण । वार्ताहर ।

उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरुन उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी गाडीने रिक्षा आणि स्कुटीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर उरण शहरातील पालवी रुग्णालयात व वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई-उरण ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने उरण-बोकडविरा या रस्त्यावर वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांची व अपघात होण्याची संख्या वाढली आहे. त्यात जय घरत या तरुणाने नुकताच दोन दांपत्याना आपल्या वाहनाने चिरडण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.15) दुपारच्यावेळी उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरुन उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी गाडीने रिक्षा आणि स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघातात रिक्षा चालक सुरज ठाकूर, देव रुपेश ठाकूर, स्कुटीचालक सोहेल सोंडे हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उरण शहरातील पालवी रुग्णालय, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version