। नाशिक । प्रतिनिधी ।
मनमाडमध्ये टॅंकरच्या भीषण धडकेत दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मनमाड-नांदगाव महामार्गावर पानेवाडीजवळ घडली असून जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये मंगळवारी (दि. 29) रात्री हि भीषण अपघाताची घटना घडली. मनमाड-नांदगाव महामार्गावर पानेवाडीजवळ एका भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मनमाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.