। माणगाव । वार्ताहर ।
पुणे-दिघी मार्गावरील निजामपूर रोडवर पाणोसे गावच्या हद्दीत पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 29) सकाळी 11 च्या सुमारास उमेश सारखले (47) रा. पाली हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून निजामपूर ते माणगाव जात होते. दरम्यान, पाणोसे गावच्या हद्दीत आले असता समोरुन येणा-या पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अतिवेगाने आणि चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील उमेश सारखले गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच, यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.