कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

। अहमदनगर । प्रतिनिधी ।
कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केडगावमध्ये घडली आहे. पती, पत्नी आणि मुलीने कर्जाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक पोहचलं आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुर्घटनास्थळावर सुसाईड नोटही आढळली आहे. आईवडीलांसह लहान मुलीचा समावेश आहे. केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर ठुबे मळा येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडला. संदिप दिनकर फाटक, (वय 40), किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10 ) अशी मयतांची नावे आहेत. फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

Exit mobile version