कर्जतमधील तीन बेपत्ता मुली नागपूरात

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अल्पवयीन मुली शाळेतुन घरी परत आल्या नाहीत, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली होत. त्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध कर्जत पोलिसांनी सुरु केल्यानंतर त्या मुली नागरपूर रेल्वे स्थानकात पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
दरम्यान,कर्जत पोलिसांचे पथक नागपूर येथे त्या मुलींना आणण्यासाठी रवाना झाले आहे. मात्र त्यांचे अपहरण करण्यात आले होते की, त्यांना फूस लावून नेण्यात आले होते कि त्या स्वतःच घरातून निघून गेल्या होत्या याचे उत्तर पोलीस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कर्जत शहरातील दहिवली भागातील इंदिरानगर आणि बामचा मळा या भागातील तीन शाळकरी मुली 13 डिसेंबर रोजी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. त्या मुली दुपारी शाळेतून नेहमीच्या वेळी घरी पोहचल्या नाहीत,म्हणून बामचा मळा येथील 15 वर्षीय मुलीच्या नातेवाईक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या दहावी मध्ये शिकणार्‍या मुलीबरोबर 16 आणि 17 वर्षाच्या आणखी दोन मुली हरवल्या होत्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी एक पथक या मुलीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते.
या अल्पवयीन तरुणाला कर्जत पॉलसीयांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या मुली चंदीगड येथे जाणार असून डहाणू गाडीने नागपूरकडे जात असल्याचे माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानुसार कर्जत पोलिसांनी नागपूर कडे जाणार्‍या गाड्यांमधून त्या तीन अल्पवयीन मुली प्रवास करीत आहेत काय याची माहिती घेण्यासाठी त्या मुलीचे फोटो पाठवून तपास घेण्याची सूचना केली होती. यानुसार या तिन्ही मुली नागपूर रेल्वे स्थानकात उतरून चंदीगड कडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत बसल्या असता नागपूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
कर्जत तालुक्यातील मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या तीन मुलीचा शोध लागला आहे. मात्र त्या अल्पवयीन शाळकरी मुली रेल्वे गाडीने चंदीगड येथे कशासाठी चालल्या होत्या.त्यांना कोणी फूस लावून कर्जत येथून पळवून नेण्याचा प्रयत्न क्जरीत होते काय?त्यांना फूस लावून पळविले जात होते काय?किंवा त्या मुलींचे अपहरण कोण कशासाठी करीत होते?या प्रश्‍नांची उत्तरे अद्याप मिळणे बाकी आहेत. मात्र या प्रकरणाने कर्जत तालुक्यात खळबळ माजली असून त्या तीन मुलींमध्ये दोन उत्तर भारतीय आणि एक मराठी मुलगी आहे.

Exit mobile version