तीन महिने उन्हाचा कडाका

हवामान विभागाचा अंदाज

| पुणे | प्रतिनिधी |
एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. एप्रिल महिन्यात पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यापेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे. 6 ते 9 एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ वगळता अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील 4 जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात वातावरणात बदल जाणवत आहे

Exit mobile version