हवामान विभागाचा इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
उन्हाळा कडक होत चालला आहे. त्यातही आता उष्णतेच्या लाटा वाहण्याची भीती भारतीय हवामान विभागाने गुरुवारी व्यक्त केली आहे. जम्मूत 7 ते 8 एप्रिल दरम्यान, 7 ला उत्तर-मध्य महाराष्ट्रात , 9-11 च्या दरम्यान विदर्भात, गुजरात आणि कच्छच्या उत्तर भागात 7 ते 9 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आणखीन तीव्र आणि नियमित उष्णतेच्या लाटा एप्रिलमधील येतील असा अंदाज हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी बुधवारी सांगितले. उत्तर पूर्व आणि मध्य भारतात तापमान वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान विभागाने या पूर्वीच एप्रिल महिना हा मार्चच्या तुलनेत तापमान अधिक असेल असा अंदाज वर्तवला होता, असे मोहपात्रा यांनी सांगितले.