2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम आंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांना व्यापक रुप देणार असल्याचं सीतारमण यांनी बजेट सादर करताना सांगितलं. यात शेतकरी, तरुण, उद्योग, व्यावसायिकांसह, महिलांसाठी नव्या योजनांची घोषणा केली आहे. महिला सबलीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम आंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांना व्यापक रुप देणार असल्याचं सीतारमण यांनी बजेट सादर करताना सांगितलं. तसेच देशातील 2 लाख आंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडीच्या रुपात अपग्रेड केले जाईल, असेही त्या म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी अंगणवाड्यांचा दर्जा सुधारला जाईल. मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला जाईल.
आरोग्यसाठी ओपन प्लॅटफॉर्म
निर्मला सीतारमण बजेट सादर करताना म्हणाल्या, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टिमसाठी एक ओपन प्लॅटफॉर्म सुरु केला जाईल. या माध्यमातून हेल्थ प्रोव्हायडर्ससाठी डिजिटल रजिस्ट्रीज, युनिक हेल्थ आयडेंटिटी आणि आरोग्य सेवा मिळवण्यासाठी युनिव्हर्सल अॅक्सेस मिळवता येईल.
इमर्जन्सी क्रेडिट लाइनचा विस्तार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरेंटी योजनेला मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली जाईल. गॅरेंटी कव्हर 50,000 कोटी रुपयांवरून वाढवून एकूण 5 लाख कोटी रुपयांपर्यंत केले जाईल.






