| पनवेल | वार्ताहर |
दोन मोटार सायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील माथेरान-पनवेल रोडवर वेदांत पब्लिक स्कूल नेरे येथे घडली आहे.
जयदीप सुर्यवंशी (27) हा त्याचा मित्र आकाश वाकोडे असे मोटार सायकलवरुन टेमघर येथून नेरेकडे माथेरान-पनवेल रोडने येत असताना वेदांत पब्लिक स्कूल येथे आले असता पनवेल बाजूकडून येणार्या मोटार सायकलवरील चालकाने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व चुकीच्या बाजूने चालवून त्यांच्या मोटार सायकलला ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात जयदीप सुर्यवंशी, आकाश वाकोडे याच्यासह अपघात करणारा मोटारसायकलस्वार हे तीघे जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दोन मोटार सायकलच्या धडकेत तिघे जण जखमी
