दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण जखमी

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परीसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली असून, याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाणे व पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. पनवेल जवळील कोन गाव ते पळस्पे जाणाऱ्या रस्त्यावरील डेरवली रेल्वे ब्रिज खाली एका अज्ञात ट्रॅकर ने ऍक्टिवा स्कुटी गाडीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक म्यानुअल जाओ डिकोस्टा (63) हे जखमी झाले आहेत . तर दुसऱ्या घटनेत मुंबई-गोवा महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्य खिंडीत विजय कदम रा. भांडुप-मुंबई हे मुंबई-गोवा महामार्गाने भांडुप येथे रिक्षाने येत असताना कर्नाळा पक्षी अभयारण्यातील उताराजवळ त्यांची रिक्षा आली असता त्यांच्या नातवाला लघुशंका आल्याने त्यांनी रिक्षा थांबवली. दरम्यान, अचानक पाठीमागून आलेल्या कारने विजय कदम यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षात बसलेला कदम यांचा मुलगा विवेक आणि पुतणी अपर्णा हे गंभीर जखमी झाले.

Exit mobile version