महामार्गावर अपघात तिघेजण गंभीर जखमी

| आंबेत | वार्ताहर |
मुंबई गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास दासगावं हद्दीत एका आर्टिगा कारचा टायर फुटून तिहेरी अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरीकडे निघालेल्या आर्टिगा कारचा टायर फुटला. त्यामुळे त्या वाहनावर रिक्षा आणि मोटारसायकल येऊन आदळल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना महाड आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.अपघातामुळे दासगावनजीक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

रत्नागिरी दिशेकडे जात असलेल्या आर्टिगाटचा टायर रस्त्यातच फुटल्याने हा अपघात झाला.यामध्ये कारचालक नरेश दिलीप पानसरे हा किरकोळ जखमी झाला आहे. तर ऑटो चालक शिवाजी कासरेकर आणि मोटरसायकल चालक अरबाज शेख हे देखील जखमी झाले आहेत. मध्ये असणारे रुदवी महेश साळवी ही महिला देखील जखमी झाली असून तिला उपचाराकरिता महाड येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाहतूक पोलीस पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी आपले सहकारी निजामपूरकर, झेपले, यांसह महामार्ग पोलीस अधिकारी यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने काढली आणि वाहतूक सुरळीत केली

Exit mobile version