बैल चोरणाऱ्या तीघा जणांना ताब्यात

| पनवेल | वृत्‍तसंस्था |

तालुक्यातील चिंध्रण गाव येथून दोन बैल तसेच देहरंग येथून एक बैल चोरीस गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय गळवे, पोह विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे व पोशि आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार मेहबुब पाशा शेख (23 रा.कुर्ला), ईलियास उर्फ आंधा कामिल कुरेशी (38 रा.कुर्ला) व फरिद आफताब शेख (25 रा.गोवंडी) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.

Exit mobile version