कंपनीची आर्थिक फसवणूक करणार्‍या तिघांना अटक

| नेरळ | बातमीदार |

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळोली येथे असलेल्या बांधकाम साईट वरील कर्मचारी यांनी आपण कंपनीच्या कामासाठी नेरळ ते मुंबई येथील कार्यालय अशी उर्मिला टूर्स कंपनीची बिले जोडली होती. त्याबद्दल खातरजमा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रवास न करता ती बिले अदा करून शार्पस्कील इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा.लिमिटेड कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी शार्पस्कील इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नेरळ पोलिसांनी तिघांना अटक केली.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत शार्पस्कील इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा.लिमिटेड या कंपनीची बांधकाम साईट नेरळ जवळील पिंपळोली भागात आहे. या कंपनीकडून आपल्या बांधकाम साईट वर काम करणारे स्वप्नील जालिंदर माने-बोपेले नेरळ आणि वैभव अनंतराव बोभाडे – बोपेले नेरळ असे तिघे अन्य कामगार यांच्यासह काम करतात. त्यांनी दिनांक 01/06/2022 रोजी ते दि.22/11/2022 या कालावधीत नेरळ ते शार्पस्कील इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा.लिमिटेड या कंपनीच्या लोअर परेल येथील कार्यलयात जाण्यासाठी भाड्याच्या कार मधून प्रवास केला. जुन 2022 ते आजपर्यंत साईटवर काम करीत असताना यातील दोघांनी वेळोवेळी नेरळ ते लोअर परेल मुंबई असा त्यांनी कंपनीच्या कामासाठी प्रवास केल्याची बिले कंपनीकडे जमा केली होती. मात्र कंपनीकडून संबंधित तारखेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांनी नेरळ ते मुंबई येथील कार्यलय असा कोणताही प्रवास केला नव्हता असे आढळून आले. त्यामुळे न केलेल्या प्रवासाची उर्मिला टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्स नावाच्या कंपनीची एकुण 24,700/-रुपये रक्कमेची एकुण सहा नकली बिले सादर केली होती.

त्यामुळे स्वतःचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी संबंधित कामगारांनी न केलेल्या प्रवासाची बिले अदा करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला होता. त्याबद्दल कंपनीची खातरजमा झाल्यानंतर कंपनीकडून सुभाष राजेंद्र लोणारी- ताडदेव मुंबई यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार नेरळ पोलिसांनी चौकशीअंती दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर 348/2022 नुसार गुन्हा दाखल असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 420,480 नुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षकी प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे करीत आहेत.

Exit mobile version