| नेरळ । वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील छायाचित्रकार यांची कार्यशाळा कर्जत फोटोग्राफर असोसिएशन यांच्याकडून आयोजित करण्यात आली होती. विविध प्रकारचे दर्जेदार कॅमेरे निर्माण करणार्या निकॉन कंपनीकडून हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील 100 हुन अधिक फोटोग्राफर यांनी दिवसभराच्या या शिबिरात हजेरी लावली. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार पराग शिंदे यांचे सर्वना मार्गदर्शन लाभले.
रायगड फोटोग्राफर असोसिएशन संलग्न असलेल्या कर्जत-नेरळ फोटोग्राफर असोसिएशनतर्फे निकोन कंपनीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रॉयल गार्डन येथे कर्जत नेरळ फोटोग्राफर असोसिएशनकडून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विवेक सुबेकर, समीर भायदे, विवेक सुभेकर, जितेंद्र मेहता, आनंद् निबरे आदी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात 50 ते 55वर्ष फोटोग्राफी करणारे अनंत देवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा असोसिएशनचे अविनाश राऊत, दीपक बडगुजर, योगेश कुंभार, विदुल सावंत, ज्ञानेश्वर बागडे, विदुल सावंत रवी पेरणे आदी उपस्थित होते.