| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गावर चिरबासाजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे तीन यात्रेकरुंचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बचाव पथक देखील दाखल झाले होते. अद्याप बचावकार्य सुरु आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (31) नागपूर महाराष्ट्र, सुनील महादेव काळे (24) जालना महाराष्ट्र, अनुराग बिष्ट, तिलवाडा रुद्रप्रयाग यांचा समावेश आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले आहे.