तिघे लुटारु अटकेत

| पनवेल | वार्ताहर |

ठाणे नौपाडा येथे आपल्या केअर टेकरसोबत राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकाचे घर लुटण्याचा प्रयत्न करणार्‍यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील पीडित हे ज्येष्ठ नागरिक असून, ते त्यांचे केअर टेकरसोबत राहण्यास आहेत. आरोपींनी या गोष्टीचा फायदा घेऊन स्विगी डिलीव्हरी बॉय असल्याची बतावणी करून पीडितांच्या घरात जबदरदस्तीने प्रवेश करून दोघांचे हातपाय रस्सीने बांधून चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडे लॉकरच्या चाव्यांची मागणी केली होती. दरम्यान, दरवाजाबाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागताच रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून आरोपींनी ड्रेनेजच्या पाईपच्या सहाय्याने इमारतीखाली उतरून पळून गेले. याप्रकरणी ऋतिक नेगी, शुभम फाफाळे, मयूर महाले यांना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून गुन्हा करताना वापर केलेल्या एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version