कोकण रेल्वे मार्गावर धावणार तीन स्पेशल ट्रेनची

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेच्या तीन स्पेशल रेल्वेगाड्या शनिवारपासून कोकण मार्गावर धावू लागल्या आहेत. यापाठोपाठ पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने आणखी तीन साप्ताहिक गाड्या जाहीर केल्या आहेत. सुरत-मडगावच्या दोन फेर्‍यांसह बांद्रा-करमळी स्पेशल गाडीचा समावेश आहे. 21 डिसेंबरपासून वसईमार्गे धावणार्‍या तिन्ही गाड्यांचे आरक्षण 19 डिसेंबरपासून खुले झाले आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मध्य रेल्वेच्या दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमळी, करमळी-पनवेल या आरक्षित स्पेशल गाड्या शनिवारपासून धावत आहेत. सुरत-मडगाव साप्ताहिक स्पेशल 21 ते 28 डिसेंबर या कालावधीत धावेल. 17 डब्यांच्या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी आदी ठिकाणी थांबे आहेत. सुरत-मडगाव साप्ताहिक स्पेशल 22, 24 व 29 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. परतीच्या प्रवासात 23, 25, 30 डिसेंबर गाडी धावणार आहे. या गाडीला 19 डबे जोडण्यात येणार आहेत.


22 डब्यांच्या गाडीला रत्नागिरीतही थांबा
बांद्रे-करमळी साप्ताहिक स्पेशल 23 ते 30 डिसेंबर दरम्यान धावेल. परतीच्या प्रवासात 24 ते 31 डिसेंबरपर्यंत या कालावधीत ही गाडी धावेल. 22 डब्यांच्या गाडीला बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

Exit mobile version