जम्मू | वृत्तसंस्था |
रविवारी पहाटे शहरातील हरवान भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा चा दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवानमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं रुपांतर चकमकीत झालं.
दहशतवाध्यांकडू झालेल्या गोळीबारानंतर जवानांनी देखील प्रत्यूत्तरादाखल गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, असे अधिकार्याने सांगितले. त्यामुळे मागच्या 33 दिवसांत श्रीनगरमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस, एसएफवरील हल्ले आणि नागरिकांच्या हत्येसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. खोर्यातील, विशेषतः श्रीनगरमधील शांतता बिघडवण्यामागे पाकिस्तानी शक्ती असल्याचे यावरून दिसून येतं असल्याचं काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं.