। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अमृतसरमधील सुवर्णमंदिराचे पावित्र्य भंग करणार्या युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.दरम्यान, कपूरथळा येथेही याच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.
कपूरथला हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात 19 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. कपूरथला मंदिराचं पावित्र्य भंग करणार्या एका आरोपीला जमावानं मारहाण केली, असं सांगितलं जातंय. ही मारहाण इतकी भयंकर होती, की संशयित आरोपीचा त्यातच मृत्यू झालाय.
दरम्यान, गुरुद्वाराचे कार्यवाह अमरजीत सिंह यांनी युवकाला केलेल्या मारहाणीचं समर्थन केले आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मंदिराचं पावित्र्य भंग करण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. शिवाय जे कुणी असं कृत्य करतील त्यांना 10 वर्षांच्या सश्रम कारावासी शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.