महाड सावित्री नदीपात्रातील घटना
| रायगड | वार्ताहर |
महाबळेश्वर येथून पर्यटनासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा महाड येथील सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. जाहीद जाकीर पटेल, दिलावर शहाबुद्दीन नालबंद आणि मुनावर शहाबुद्दीन नालबंद अशी मृतांची नावे आहेत. या संदर्भात संबंधितांकडून स्थानिक प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन यंत्रणा सक्रिय होऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी ही तीन कुटुंबे महाबळेश्वर येथून महाड येथे आली होती. खाडीपट्टा येथे असलेल्या सव गरम पाण्याच्या कुंडामध्ये पोहण्यासाठी आली होती. त्यानंतर ते सावित्री नदीपात्रात गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पहिल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य दोघे गेले असता तिघे जण बुडाले. महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक रेस्न्यू टीमने एक तास प्रयत्न करत तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.