दिव्यांग विद्यार्थिनीला तीन चाकी सायकल भेट

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील सहयोग अपंग (दिव्यांग) कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून वरसे ग्रामपंचायत सरपंच नरेश पाटील यांच्या पाठपुराव्याने 10 वीमध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थीनी शांती राम शेखर यादव हिला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.

यावेळी नंदकुमार मरवडे, केशव म्हस्के, सहयोग अपंग (दिव्यांग) कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता, सचिव रमेश खराडे, खजिनदार संजय गौतम टि.टी. किरण मोहिते, सह खजिनदार निवृत्ती सुर्वे, चंद्रकांत संसारे, सुरेश शेडगे, सुनिल दळवी, स्मिता गजमल, जयश्री पुजारी, वैशाली पवार, सुर्वणा मांगले आदींच्या उपस्थितीमध्ये लाभार्थी शांती यादव हिला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. सूत्रंचालन  उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता, सचिव रमेश खराडे यांनी केले. नंदलाल गुप्ता यांनी आभार मानले.

Exit mobile version