एसटी, कार आणि दोन दुचाकींचे नुकसान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग पेण रस्त्यावर मद्यधुंद चालकांच्या भरधाव कारने दोन दुचाकी आणि एका कारसह एसटीबसला ठोकर दिल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पिंपळभाट येथे रात्री 8 च्या सुमारास हा अपघात झाला. सागर थोरात असे चालकाचे नाव असून ते पर्यटनासाठी शिर्डीहून आले होते. सदर चालकासह अन्य तिघेजण या कारमध्ये होते. भरधाव वेगाने कार (क्रमांक एमएच 12 एफ पी 5785) चालवित असताना पिंपळभाट येथे आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटून समोर येणार्या एका दुचाकीला त्याने उडवले. त्याचवेळी पॅशन दुचाकीस्वाराने सावध होत उडी मारल्याने तो बचावला. तर तर दुसर्या शाईन दुचाकीला देखील उडवले. त्याचवेळी समोर येणार्या टिआगो कारवर या अपघातातील दुचाकी घासून गेल्याने त्या कारचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतरही भरधाव असणारी कार समोरुन येणार्या अलिबाग पेण एसटी क्रमांक एमएच 20 बी एल 3217 च्या मागील बाजूकडील चाकात जाऊन अडकली. अपघातानंतर कार चालकाने पलायन केले. मात्र स्थानिक आणि पोलीस हवालदार सुनील फड यांनी शिताफिने त्याला ताब्यात घेत अलिबाग पोलिस ठाण्यात हजर केले. सदर चालकाविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येत होता.
