नागाव सरपंच आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी निधी मंजूर

दिवाळीपूर्वी होणार रस्त्याचे काम पुर्ण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शेकापचे जिल्हा परिषद माजी सदस्य अ‍ॅड आस्वाद पाटील यांच्या प्रयत्नातून नागाव बंदर रस्त्याचे सुरु झालेले काम जिल्हा परिषदेवर प्रशासक आल्यानंतर बंद पडले होते. सदर काम परत सुरु करण्यासाठी नागाव बंदर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्यांनी पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सदर रस्त्यासाठी 18 लाख रुपयांचा तातडीचा निधी मंजूर करुन कामास मंजुरी दिली आहे. त्यानुसार सदर रस्त्याच्या कामाचे कंत्राटदाराने पाहणी करुन एक दोन दिवसात काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नागांव बंदर रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी प्रयत्न करीत कामाला मंजुरी आणली होती. त्यानुसार कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आल्याने सुरु असलेल्या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे हे काम अपूर्ण राहिले होते. या अपूर्ण कामाबद्दल सोमवारी ग्रामपंचायत सरपंच निखिल नंदकुमार मयेकर व उपसरपंच रसिका प्रधान तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नागांव बंदर येथील ग्रामस्थ यांनी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट घेतली व रस्ताच्या अपूर्ण कामाबद्दल विचारणा केली. व काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली.

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी सर्व ग्रामस्थ व सरपंच आणि सदस्य, ग्रामपंचायत नागांव यांच्या भेटीनंतर तात्काळ रूपये 18 लाख तातडीचा निधि मंजूर करून कामास मंजूरी दिली आहे. त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांचे सरपंच निखिल मयेकर यांनी आभार मानले. सदर काम सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून कंत्राटदाराकडून या कामाची आज पाहणी देखील करण्यात आली असून एक दोन दिवसात सदर काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान रस्त्याच्या कामासाठी नागाव बंदर ग्रामस्थाच्यावतीने बुधवार 19 ऑक्टोबर रोजी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.

Exit mobile version