मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; अवकाळी पावसाचे संकट कायम

। मुंबई । वृत्तसंस्था ।

रायगड आणि रत्नागिरी येथेही बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, गुरुवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पालघर येथे बुधवारी, तर पालघर येथे गुरुवारीही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुरुवारी ठाणे आणि मुंबई येथे पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. सिंधुदुर्गात मात्र त्या मानाने दोन दिवस फारसा पाऊस नसेल. मुंबईमध्ये मंगळवारी सांताक्रूझ येथे ३३ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मात्र वातावरणात आर्द्रता असल्याने तापमानाच्या तुलनेत अधिक उकाड्याची जाणीव मुंबईकरांनी अनुभवली. कुलाबा येथे मंगळवारी ७४ टक्के तर सांताक्रूझ येथे ६८ टक्के सापेक्ष आर्द्रता होती.

राज्यात अद्याप अवकाळीचे संकट कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमाकुळ घातला असतानाच आता मुंबईतही पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये अजूनही विश्रांती घेतलेली नाही. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version