तिकीट तपासनिस विजय लांडगेयांनी दोघांचे प्राण वाचले

। नेरळ । प्रतिनिधी ।

उपनगरीय लोकलमधून प्रवास करणार्‍या दोन प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. तिकीट तपासनीस विजय लांडगे यांनी प्रसंगावधान दाखवल्याने हे शक्य झाले आहे. माथेरान शटल रेल्वेसाठी सेवा बजावत असेलेले तिकीट तपासणीस विजय लांडगे हे कामावर जाण्यासाठी (दि. 24) जून रोजी बदलापुरहून नेरळकडे निघाले होते. 10 वाजून 38 मिनीटांनी ते सहकारी तिकीट तपासणीस जोशी यांच्यासह नेरळ स्टेशनवर उतरले. नेहमी प्रमाणे ते दोघेही स्टेशनच्या बाहेर जाऊन टॅक्सीने माथेरानला जाण्या करता नेरळ स्टेशनहून निघाले दरम्यानच्या काळात फलाटाहून गाडी सुटली. परंतु, चालत्या गाडीतून एक प्रवासी आपल्या दोन लहान मुलांना घेऊन गाडीतून उतरत असल्याचे विजय लांडगे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखून जिवाची पर्वा न करता या दोन मुलांसह त्यांच्या पालकांना गाडीतून बाहेर खेचले. त्यामुळे होणारी अघटित घटना टळली. याबाबत लांडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजय लांडगे यांनी या आधी सुध्दा माथेरान मिनिट्रेनमध्ये अनेक प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तु परत केल्या आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे.

Exit mobile version