अलिबाग-मुरूड प्रीमियर लीग स्पर्धेत टायगर इलेव्हन वाघोली विजेता


जिया एन्जेल खैरवाडी संघाला उपविजेतेपद
। रेवदंडा । वार्ताहर ।

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर पुरस्कृत अलिबाग-मुरूड प्रीमियर लीग 2022 मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आदिवासी समाज बांधवांसाठी आयोजित करण्यात आली होती. या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आदिवासी इलेव्हन स्टार असोसिएशनचे वतीने दि. 15,16,17 एप्रिल रोजी रेवदंडा हरेश्‍वर मैदानात पार पडली. या स्पर्धेत टायगर इलेव्हन वाघोली संघ जिया एन्जेल खैरवाडी संघाचा पराभूत करीत अंतिम विजेता ठरला.
या स्पर्धेत टायगर इलेव्हर वाघोली प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर जिया एन्जेल खैरवाडी व्दितीय, एंजल इलेव्हन किहीम तृतीय व एस.बी. चिचवंली चतुर्थ क्रमांकाचे विजेते ठरले. स्पर्धेत उत्कृष्ट फलदांज सागर, उत्कृष्ट गोलदांज सुभाष, तर अंतिम सामनाच्या सामनावीर किशोर नाईक व मालिकावीर किशोर नाईक यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचा शुभारंभ राजिप माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी समाज जिल्हा अध्यक्ष भगवान नाईक व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत भगवान नाईक वरंडेपाडा पुरस्कृत- कै. भावेश इलेव्हन चौल, किशोर नाईक वाघोली पुरस्कृत टायगर इलेव्हन वाघोली, रूपेश नाईक बामणसुरे पुरस्कृत-पिंट्या गायकवाड बामणसुरे, यशवंत वाघमारे सारळ पुरस्कृत रोहन स्पोर्ट्स सारळ, नवनाथ नाईक बसणीपाडा पुरस्कृत जयेश एलेव्हन बसणीपाडा, अविनाश नाईक वरंडेपाडा पुरस्कृत रूद्र स्पोर्ट्स वरंडेपाडा, योगेश काष्टे खैरवाडी पुरस्कृत जिया एन्जेल खैरवाडी, सुभाष हिलम चिंचवली पुरस्कृत एस.बी. चिंचवली, सुभाष पवार किहीम पुरस्कृत एंजल खैरवाडी, मुकेश नाईक पुरस्कृत वरून वरद मॉगोज पळी, सुरेश नाईक चंदरवाडी पुरस्कृत वन किंग स्टार श्री गणेश, अशोक नाईक ताडवागळे पुरस्कृत विवेक इलेव्हन ताडवागळे, मंगळ नाईक श्रीगण पुरस्कृत जिजा एलेव्हन श्रीगण, काशिनाथ नाईक चंदरवाडी पुरस्कृत रिेयेश डायनामोस, अजय नाईक खुटलवाडी पुरस्कृत सार्थक इलेव्हन स्टार खुटळवाडी, अविनाश वाघमारे पुरस्कृत अन्वी इलेव्हन सारळ असे 16 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिलीप भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रथम क्रमांकास रूपये 51 हजार रोख व चषक, द्वितीय क्रमांकास रूपये 31 हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकास रूपये 21 हजार रोख व चषक, चतुर्थ क्रमांकास 21 हजार रोख व चषक तसेच उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलदांज, अंतिम सामनावीर व मालिकावीर यांना विशेष बक्षिसे प्रदान करण्यात आली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आदिवासी स्टार इलेव्हर असोसिएशन व आदिवासी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष भगवान नाईक यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version