| पनवेल | प्रतिनिधी ।
भरधाव वेगाने पनवेल बाजूकडून पेण बाजूकडे जाणाऱ्या होंडाई गाडीचा टायर कर्नाळाखिंडीत उतरणीवर अचानकपणे फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत, गाडीतील दोघे प्रवासी बचावल्याची घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.

ठाणे बाजूकडून पेण बाजूकडे होंडाई गाडी (एमएच०५ एजे७८७४) ही घेऊन दोघेजण भरधाव वेगाने जात असताना, कर्नाळाखिंडीत उतरणीवर या गाडीचा टायर अचानकपणे फुटल्याने गाडीवरील चालकाचा ताबा सुटून सदर गाडी विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये गेली. या वेळी गाडीत लावलेली एअरबॅग उघडल्याने गाडीतील दोघाजणांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आहे.
या दुर्घटनेमुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पथक घटना स्थळी रवाना होऊन त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली.