टिटवे बनले ‘स्वप्नातील गाव’

। माणगाव । प्रतिनिधी ।
स्वदेस फाऊंडेशन व गावविकास समिती व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नातील गाव कार्यक्रम खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.22 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात टिटवे गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले.

स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, आत्मनिर्भर व आदर्श गाव विकास समिती ही पाच मापदंडे व 62 कामांच्या 70 टक्के कामे पूर्ण करून गावाने स्वप्नातील गावाचा दर्जा पटकाविला. शासन व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून तसेच श्रमदान व लोकसहभागातून टिटवे गावाने उत्कृष्ट कार्य केले व स्वप्नातील गाव या संकल्पनेकडे वाटचाल सुरू केली.
या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गावाला आदर्श व स्वप्नातील गाव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बाबूशेठ खानविलकर, स्वदेस फाऊंडेशन चे संचालक प्रदीप साठे व व राहुल कटारिया, वरिष्ठ व्यवस्थापक विकास खरमाळे, व्यवस्थापक मेघना फडके, सहव्यवस्थापक भीमराव भालेराव, संकेत आहेर, सतीश भोसले, अमित गुप्ता, सरपंच, उपअभियंता श्री. बारापत्रे, शिरवली ग्रामपंचायत सरपंच सुमन काटकर, जिते ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेविका मयुरी पवार, मंडळ अधिकारी जितेंद्र टेम्बे, तलाठी गुणवंती वाघ, मुख्याध्यापक अनिल पावरा, अंकुश गोळे, पोलीस पाटील राजेंद्र सावंत, चंद्रकांत पवार, लक्ष्मण म्हाळुंगे, भागोजी भद्रिके, ग्रामविकास समिती अध्यक्ष अशोक गायकवाड, उपाध्यक्ष सखाराम मोरे, सचिव अनिशा दामुगडे, अर्चना अंबिके, सारिका गावस्कर व सदस्य व सुनील पवार, हिरामण गायकवाड, मनोज कदम, अनिल मोरे, सुरेंद्र पालांडे, स्वदेस चे वरिष्ठ समन्वयक चांगदेव सानप आदी उपस्थित होते.

Exit mobile version