तिवरे ग्रा.पं. उपसरपंचपदी संतोष भासे यांची बिनविरोध निवड

| कर्जत | प्रतिनिधी |

तिवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे संतोष रघुनाथ भासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच चित्रा भासे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

सरपंच चंद्राबाई पुंडलिक वळवे यांच्या अध्यक्षतेखाली तिवरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंच पदाच्या निवडणुकी बद्दल विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसेवक सुभाष पवार, ग्रामपंचायतीचे सदस्य संजय तिखंडे, चित्रा भासे, अपर्णा दगडे, उज्वला ठाकरे, जनाबाई पवार, सुजाता दाभणे, सुश्मिता जाधव, अनिल पवार, गुरुनाथ दगडे, प्रमोद ठाकरे, स्वाती घरत आदी उपस्थित होते.

भासे यांचे आ.महेंद्र थोरवे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी विधानसभा संघटक शिवराम बदे, नगरसेवक संकेत भासे, वरई ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश फराट, अरुण देशमुख, भालचंद्र घोडविंदे, जितेंद्र भासे आदी उपस्थित होते.

Exit mobile version