नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रुपग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रमिला ठाणगे यांनी राष्ट्रवादीचे भास्कर लोंगले यांचा पराभव करून विजय मिळविला. भारती पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी पसरपंच ठाणगे यांचे अभिनंदन करण्यासाठी शरद ठाणगे, अविनाश भासे, शाखाप्रमुख समीर साळोखे,लहू श्रीखंडे,विलास ठोंबरे, आदींसह मंगेश ठोंबरे,दिनेश भासे,संतोष शेळके, सोपान ठाणगे,विकास भासे,हेमंत घारे,दशरथ आहिर उपस्थित होते.