आघाडीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार: खा. तटकरे

धाटाव | वार्ताहर |
सध्या राज्यात काय सुरू आहे या सर्व गोष्टीत कुठलेही मतप्रदर्शन करण्यापेक्षा आपल्याला आगामी निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान जिल्हा परिषद, पंचायत समित्या अथवा नगरपालिकेत राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय कुणालाही सत्तेवर बसता येणार नाही या स्थितीवर नेऊ या, असे सांगून राज्यपातळीवर, जिल्हापातळीवर आघाडीचा जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करीत 100 टक्के यश आपल्याला मिळवायचे आहे, असे आवाहन खा. सुनील तटकरे यांनी केले.
रोह्यात धाटाव विभागातील किल्ला येथे ओम नम शिवाय मंगल कार्यालयात रविवारी रा.काँ. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळावा व जाहीर सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी पालकमंत्री आ. अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, यांसह विविध सेलचे अध्यक्ष, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाचे अध्यक्ष, विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विनोद पाशिलकर, युवक अध्यक्ष जयवंत मुंढे यांसह सहकारी वर्गाने केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत दिघे यांनी केले.

Exit mobile version