मुख्याधिकारी पंकज भुसे यांची नियुक्ती
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड नगरपरिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने शासनाने मुरूड-जंजिरा मुख्याधिकारी पंकज भुसे यांची नगरपरिषदांवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वत्रिक निवडणूकांकरिता प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे पंकज भुसे आसणार आहेत. त्यामुळे नगरपरिषदेवर प्रशासक राजवट सुरू झाली आहे.
मुरुड नगरपरिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती
