। तळा । वार्ताहर ।
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्या एकता दौड कार्यक्रमात तळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तळा तहसीलदार ए. एम .कनशेट्टी यांनी केले आहे. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तालुक्यात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ व एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या दिवशी सकाळी 7.00 वाजता तळा शहरामधील चंडिका माता मंदिर ते नगरपंचायत कार्यालय दरम्यान होणार्या एकता दौड या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन तळा तहसीलदार यानी केले आहे.