| पनवेल | प्रतिनिधी |
बंदी घालण्यात आलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या कामोठे येथील दोन पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन तसेच कामोठे पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईतून 2 हजार 968 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी प्रियांका अडाले सांगण्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील रघुवीर पान शॉप आणि जय श्री श्याम पान येथे धाडसत्राची कारवाई करण्यात आली. शासनाने विक्रीस बंदी घातलेल्या विविध कंपन्यांच्या पानमसाला, सुगंधी तंबाखू व सुपारीचे एकूण 440 पाऊच असा अंदाजे 2 हजार 968 रुपयांचा साठा आढळून आला. पंचनाम्यानंतर हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पान शॉप चालक अहमद (40) आणि ओमप्रकाश सोलाटे (42) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







