। मुरूड । वार्ताहर ।
सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागातर्फे दि. 8 मे रोजी किल्ले उंदेरीवर चार आयर्न ओतीव पद्धतीचे लोखंडी तोफगाडे बसविण्यात आले. तोफगाडा दुर्गार्पण सोहळा अत्यंत दिमाखात व उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दुर्गसेवकांनी सहभाग नोंदविला. सोहळ्यासाठी माजी जिल्हापरीषद सभापती दिलीप भोईर ग्रामपंचायत उपसरपंच श्री माने, जय मल्हार मालीकेतील खंडोबाची भुमिका साकारणारे श्री देवदत्त नागे व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजंगुंडे याच्या प्रमुख उपस्थीतीत तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी उपस्थित सर्व दुर्गसेवकांचे सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे जितेन म्हात्रे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करुन या शिवकार्यात हातभार लावलेल्या सर्वांचेच आभार व्यक्त करुन सोहळ्याचा समारोप केला.