आता इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
| नागपूर | प्रतिनिधी |
राज्यभरातील इलेक्ट्रिक वाहनांना आतापर्यंत टोल भरावा लागत होता. मात्र, आता इलेक्ट्रिक भरलेला आतापर्यंतचा टोल त्यांना परत मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही एक्स्प्रेसवेवर टोल न घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून, बुधवारी (दि. 10) या अधिवेशनात इलेक्ट्रिक वाहनांवरील टोलसंदर्भात चर्चा झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-वाहने) टोलमाफी आठ दिवसांच्या आत लागू करण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच टोलमाफीनंतर वसूल केलेला कोणताही टोल वाहन मालकांना परत करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल घेणे बेकायदेशीर राज्यभरातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना एक्स्प्रेस वे अन् इन हायवेवर टोलमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानंतरही इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल घेणे बेकायदेशीर असणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता राज्यभरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवावी. याव्यतिरिक्त, ई-वाहन चालकांना सुविधा देण्यासाठी विद्यमान स्टेशनची क्षमता वाढवावी, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात इलेक्ट्रिक वाहनांवरील टोल माफीचा प्रश्न आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या आत टोल वसूल न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. तसेच राज्यभरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्याची आणि ई-वाहन चालकांना सुविधा देण्याबाबतही त्यांनी सूचना जारी केल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीवर मंत्री दादा भुसे यांनी असे म्हटले आहे की, तांत्रिक कारणांमुळे ईव्हीची टोलमाफी अंमलबजावणी तीन महिन्यांनी लांबली आहे. मात्र, लवकरच या प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार असून, राज्यातील ई-वाहन वापरकर्त्यांना लवकरच टोलमाफीचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
