चिपळूणमध्ये प्रथमच इस्त्राइल तंत्रज्ञानाने टोमॅटो लागवड

प्रगतशील शेतकरी प्रवीण कांबळींचा अनोखा प्रयोग
| चिपळूण | प्रतिनिधी |

कापसाळ येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण अंकुश कांबळी यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये प्रथमच आधुनिक इस्त्राइल तंत्रज्ञानाने टोमॅटो लागवड केली आहे. सदर प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 10 गुंठे जागेत उभारला आहे. यासाठी बारा लाख रुपयाचा खर्च आला आहे. यासाठी 4,71,240 रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले असून, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चिपळूण यांनी दिले आहे.

प्रवीण कांबळी यांनी पॉलिहाऊस व त्यातील घेतली जाणारी पिके व पिकांची काळजी, औषधोपचार, रोपावरील रोग व त्याला कशाप्रकारे प्रतिबंध केल जाईल, याबाबत माहिती सांगितली. टोमॅटो लागवड करून येणारे उत्पन्न व मिळणारी रोपे याबाबतदेखील सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल आडके, अशोक शेडगे, पंकज कोरडे, संतोष जाधव, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चिपळूण शाखाधिकारी सागर कारले आदींसह तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रतिज्ञा कांबळी यांनी कोकमाची रोपे देऊन केले.

Exit mobile version