| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन शनिवारी (दि.6) आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमीमध्ये दाखल होणार आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने समता सैनिक दल या ठिकाणी नेमण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर 1956 मध्ये महापरिनिर्वाण झाले. महामानवाच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या दादर येथील चैत्यभूमीमध्ये दरवर्षी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. याही वर्षी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आनुयायी दादर येथे दाखल होणार आहेत. काही मंडळी आज दाखल झाले आहेत. तर, काही मंडळी शनिवारी सकाळी निघणार आहेत. त्यामुळे चैत्यभूमीवर अलोट गर्दी होणार आहे. भीम अनुयायींची गैरसोय होऊ नये, म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्वांना दर्शन घेता यावे, यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उद्या महापरिनिर्वाण दिन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606