दहा जागांसाठी उद्या मतदान

विधानपरिषदेची उत्सुकता शिगेला
| मुंबई | प्रतिनिधी |

विधान परिषदेच्या रिक्त होणार्‍या दहा जागांसाठी सोमवार, दि. 20 जून रोजी मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणीदेखील होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपापल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. त्यामुळं प्रत्येक पक्ष आपापल्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखली आहे. रिक्त होणार्‍या जागांपैकी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, रामनिवास सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. राज्यसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक लागल्याने राजकिय घडामोडी वाढल्या आहेत.

Exit mobile version