उद्या रंगणार नेहुलीमध्ये कुस्त्यांचा थरार

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत, अलिबाग तालुक्यातील श्री बहिरेश्वर मित्र मंडळ आणि इंडियाच्या सहकार्यातून नेहुली येथे कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. बुधवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही स्पर्धा शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु होणार आहे.

यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, पंचायत समिती माजी सभापती सुरेश पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, शिवसेना जिल्हा समन्वय अमिर ठाकूर, खंडाळेचे उपसरपंच अशोक थळे, माजी उपसरपंच विनोद पाटील, नेहुली-खंडाळे हायस्कूलचे सभापती नाशिकेत कावजी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित नाईक, ग्रामपंचायत सदस्य नरेश गोंधळी, संतोष कनगुटकर, उद्योजक अर्जुन चिमणे, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष विलास वालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक ऋषिकांत भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

गावाबरोबरच परिसरातील कुस्ती खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी श्री बहिरेश्वर मित्र मंडळाने गेली 20 वर्षांची परंपरा जपली आहे. ही परंपरा आजही कायम ठेवत गणेशोत्सवानिमित्त नेहुलीमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, शेकाप कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मान्यवरांच्या स्वागताच्या तयारीपासून कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी नियोजन केले आहे.

Exit mobile version