मतमोजणीची कमालीची उत्सुकता
। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 70 उमेदवारांनी व 110 सदस्यपदासाठी 394 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी (20 डिसेंबर) जाहीर होणार्या निकालावरून समजणार आहे. सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हे सकाळी 9:30 वाजल्या पासून सुरूवात होणार आहे. ही मतमोजणी कोकण एज्युकेशनच्या लिटल एंजल स्कूलमध्ये होणार आहे.
पहिल्या फेरीत टेबल क्र. 1 वाशीवली, टेबल क्र. 2 कोप्रोली, टेबल क्र.3 आमटेम, टेबल क्र.4 काराव, टेबल क्र.5 जिते, टेबल क्र. 6 दुरशेत, टेबल क्र. 7 पाटणोली, टेबल क्र. 8 हमरापूर , टेबल क्र. 9 सावरसई.
दुसर्या फेरीत टेबल क्र. 1 वरसई, टेबल क्र. 2 सापोली, टेबल क्र. 3 वरप, टेबल क्र. 4 खरोशी, टेबल क्र. 5 जिते, टेबल क्र. 6 कळवे, टेबल क्र. 7 दादर, टेबल क्र. 8 डोलवी, टेबल क्र. 9 निगडे.
तीसर्या फेरीत टेबल क्र. 1 करोटी, टेबल क्र. 2 रोडे, टेबल क्र. 5 कणे, टेबल क्र. 6 मसद बुद्रुक, टेबल क्र. 8 कोलेटी, टेबल क्र. 9 आंबिवली, अशा फेर्यांमध्ये निकाल लागणार आहे. मात्र आयत्यावेळी वेळेचा विचार करुन यामध्ये फेरबदल देखील होण्याची शक्यता असल्याची माहिती नायब तहसीलदार नितीन परदेशी यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.
एकंदरीत पेण तालुक्यातील 25 ग्रामपंचायतच्या निकालीसाठी तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, सुरेश थळे यांच्यासह निवडणूक नियंत्रण टीम काम पाहणार आहेे. तर पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर आणि दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेणार आहेत.