सर्वस्व गमावलेला तळीयेतील जवान सैन्यदलात अव्वल

| पाली/बेणसे | वार्ताहर |
डोळ्यासमोर आई, वडिल, बायको, बहीण यांच्यासह सारं घरदारच जमिनीत गाढले असताना, सर्वस्व गमावूनही आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेल्या तळीये, ता.महाड येथील अमोल कोंडाळकर याची कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी ठरली आहे. तळयीचा बहादूर जवान अमोल कोंडीलकर भारतीय सैन्यात अव्वल असून, 150 जणांच्या ग्रुपमध्ये combat enginering instructor या महत्वाच्या कोर्समध्ये प्रथम येत पदक पटकावले आहे. आपल्याला मिळालेले यश हीच आई वडिलांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

गतवर्षी तळीये या छोट्याशा गावावर आलेल्या आपत्तीने कित्येकांनी आपल्या रक्ताचे अनेकजण गमावले. असेच अमोल कोंडाळकर या जवानाने आपले आई, वडील, बायको, बहीण, यांना गमावले. शत्रूने आक्रमण करावे या प्रमाणे ही आपत्ती या जवानावर कोसळली होती. अशा परिस्थितीतस्वतःला धीर देत, सर्व दुःख काळजाच्या कोपर्‍यात ठेवत या जवानाने देश सेवेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. एवढेच नाही तर सैन्यदलात त्याने सन्मानाचा किताब देखील पटकावला आहे.

अमोलने सैन्यात भर्ती व्हाव, भारतमातेची सेवा करावी ही त्याच्या आईवडिलांची इच्छा होती,त्यानुसार तो सैन्यात सन 2012 मध्ये भर्ती झाला होता. अमोलची आई उषा कोंडाळकर या राजिप शाळा तळीयेमध्ये आहारिका म्हणून नोकरी करीत होती. वडील पांडुरंग तात्या कोंडाळकर हे शेती करीत असत. बहीण काजल पांडुरंग कोंडाळकर व पत्नी सौ.अश्‍विनी अमोल कोंडाळकर असा सुखी परिवार होता. 22 जुलै 2021 च्या दरड दुर्घटनेत अमोलने आपले सर्व कुटुंब गमावले. त्यावेळी अमोल पुणे मध्ये एक महत्वाचा कोर्स करीत होता. या दुःखद व हादरवून टाकणार्‍या घटनेने अमोल सर्व अपूर्ण सोडून घरी आला.
आभाळाएवढं दुःख पचवत त्याने आई वडिलांचे स्वप्न साकारले, अमोल मोठया परिश्रमाने सैन्यात भरती झाला देखील. पण त्याचे यश पाहायला आई वडील या जगात राहिले नाहीत. इंडियन आर्मीमध्ये नोकरी करतो, या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झाले. मला माझ्या गाव व कुटुंबाला माझ्याकडून काहीतरी आगळी वेगळी श्रद्धांजली द्यावी असे मी मनात ठाणले. त्यासाठी सर्व दुःख मनात दाबून पुन्हा कर्तव्यासाठी रुजू झालो. आणि combat enginering instructor यामध्ये प्रथम क्रमांक व पदक पटकावून युनिट, गाव व कुटुंबाच नाव पुन्हा उंचावर नेलं, अशी अमोल कोंडाळकर याने आपली भावना व्यक्त केली.

नाम, नमक व निशाण यासाठी आपण जगल पाहिजे, ज्या आईवडिलांनी आपल्याला नाव दिल, ज्या मातीच आपण मीठ खातो, जीच आपल्यावर ऋण आहे, तसेच आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी तिरंग्याच्या रक्षणासाठी आपण जगलो पाहिजे, दुःख सहनशक्ती पलीकडचे होते, मात्र ज्या आईवडिलांनी आपल्याला अपार कष्ट करून हालअपेष्टा सोसून मोठं केलं त्यांचं स्वप्न आपण साकार केलं पाहिजे या भावनेने आपण सैन्यात पुन्हा एकदा सामील होऊन माझं कर्तव्ये बजावत असल्याचे अमोल कोंडाळकर याने सांगितले.

दुर्घटनेला एक वर्ष
दुर्घटनेला येत्या 22 जुलै शुक्रवार रोजी 1 वर्ष पूर्ण झाले, येथील एका एका घरातील 15 , 15 लोक मृत्युमुखी पडले, यामध्ये काहींचे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब ढिगार्‍याखाली गेले. कुणाचा बाप, कुणाची आई, कुणाचा भाऊ, कुणाची पत्नी, तर कुणाच्या पोटचे गोळे, काही लेकींचे माहेर च राहिले नाही, या दुर्घटनेत जवळपास 90 जण मृत्युमुखी पडले, आभाळाएवढे दुःख मनात घेऊन प्रत्येक दिवस त्या भयानक पहाडाकडे पाहत अश्रू गाळणार्‍या नातेवाईकांच्या वाट्याला चांगले दिवस नाहीत. आजही मृतांच्या नातेवाईकांना मूलभूत पायाभूत सेवा सुविधा नाहीत, हे देखील स्थानिक प्रशासन व सरकारचे अपयश म्हणावे लागेल.

तळीये दुर्धटनेला शुक्रवारी (22 जुलै)एक वर्ष पूर्ण झाले. मला माझ्या गाव व कुटुंबाला माझ्याकडून काहीतरी आगळी वेगळी श्रद्धांजली द्यावी असे मी मनात होते त्यासाठी सर्व दुःख मनात दाबून पुन्हा कर्तव्यासाठी रुजू झालो. आणि एका कोर्सला सुरवात केली. दिवसरात्र मेहनत करून मोठ्या जिद्दीने त्या कोर्स मध्ये वर्चस्व मिळवले. 150 जणांच्या ग्रुपमध्ये लेालरीं शपसळपशीळपस ळर्पीीीींलीेीं यामध्ये प्रथम क्रमांक व पदक पटकावून माझे युनिट, गाव व कुटुंबाच नाव पुन्हा उंचावर नेलं. – अमोल कोंडाळकर, भारतीय जवान

Exit mobile version