। रसायनी । वार्ताहर ।
महाराष्ट्रात अखिल भारतीय जनरल युनियनच्या नेतृत्वाखाली अनेक कामगारांना न्याय देण्याच कार्य चालू आहे. पण केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच विरोध करीत श्रमिकांच्या कल्याणासाठी व महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी अखिल भारतीय कामगार युनियन अध्यक्ष कामगार नेते नितीन बंटी लाड यांनी माजी आमदार शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल हाती घेतली.
गुरुवारी (दि.9) सायंकाळी 06 वाजता तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानात उरण येथे होणार्या महाविकास इंडिया आघाडीच्या जाहीर सभेसाठी यावेळी जोरदार तयारी होत असून त्यासाठी हाजरो शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेसाठी माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार शेकाप नेते जयंत पाटील, आमदार रोहित पवार व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे व अनेक मान्यवर व मोठया संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. ही मशाल स्थानिक कामगार संघर्षात प्रकाश दाखवण्याचा कार्य करेल, असा विश्वास आहे असे उरण येथील शिवसेना कार्यालयाच्या बैठकीत कामगार नेते लाड यांनी स्पष्ट केले.