| पनवेल | वार्ताहर |
खारघरमधील एका विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हरियाणा येथील अंबाला येथे घडली. यामध्ये विवाहितेच्या माहेरकडून घर आणि कार्यालय खरेदीसाठी 84 लाख रुपये उकळले आणि तिला मारहाण केली आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पीडितेचे 3 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि दागिने पतीने स्वतःकडेच ठेवले असल्याचे सांगितले आहे. तसेच, विवाहितेन सांगितले की 2019 पासून आतापर्यंत छळ करण्यात आला आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे हे अधिम तपास करीत आहेत.







